क्राईम

पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू- ना.गुलाबराव पाटील

जळगाव -एबीपी माझाच्या दोन प्रतिनिधीं वर शिर्डी संस्थान च्या वतीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
या घटनेचा “मिडियामेल” न्युज तर्फे जाहीर निषेध !!!
तसेच सदर घटनेचा आपण निषेध करतो हा लोकशाही च्या चौथ्या स्तंभांला दाबण्याचा हा प्रकार असल्याच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
एबीपी माझाच्या नितीन ओझा आणि मुकुल कुलकर्णी या दोन पत्रकांरांच्या वर शिर्डी संस्थानच्या वतीने काल पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते या घटनेचा सर्व थरातून निषेध होत असताना पाहायला मिळत असताना,सत्ताधारी पक्षातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध केला असून पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याच म्हटलं आहे.शिर्डी संस्थेचा आणि शिर्डी पोलिसांच्या वर ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. पत्रकारांनी काही डफ लावून गर्दी गोळा केली नव्हती ,जे आहे ते पत्रकार मांडण्याचा प्रयत्न करीत असतो,अडीच महिन्या नंतर संस्था आणि पोलिसांना गर्दी गोळा केल्याचा साक्षात्कार होतो ,हे सर्व मुंगेरी लालचा कार्यक्रम आहे ,हा सर्व कुटील डाव आहे आपण या घटनेचा निषेध करतो अस सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच सदरील घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निषेध केलेला असून सदरील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रविण सपकाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.