क्राईम

पत्रकारास बेदम मारहाण करून लुटल्याची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

भुसावळ : तालुक्यातील दीपनगरचे पत्रकार सुमित अशोक निकम यांना 31 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्री 12.30 वाजेनंतर भुसावळ-दीपनगर बायपास जवळील सटमाय माता मंदिराजवळ पोलिस कर्मचारी सुरेश महाजन व त्यांच्या सोबतच्या अनोळखी इसमाने लुटमार करत बेदम मारहाण केल्याची तक्रार पत्रकार सुमित निकम यांनी जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.तसेच सुमित निकम यांच्या खिश्यात असलेली 10 हजारांची रोकड, 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व चैनमधील तीन ग्रॅम वजनाचे पदक या वस्तू वरील दोघांनी हिसकावून घेतल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अद्याप जाबजबाब घेतला नसल्याचे भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.