आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानचे 45 जवान ठार, बलुच लिबरेशन आर्मीचा दावा

पाकिस्तानचे 45 जवान बलुचिस्तानच्या हल्ल्यात ठार झाले असल्याचं वृत्त हाती येत असून याबाबत पाकिस्तानातील बलोच लिबरेशन आर्मीने त्यांच्या ट्वीटरवरून ट्वीट करून याबाबतचा दावा केलेला आहे.

मात्र पाकिस्तानच्या इंटक सर्विसेस पल्बिल रिलेशन्सचे महानिर्देशक मेजर नजर बाब इफ्तिखार यांनी या हल्ल्यात 10 जवान मारले गेल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांच्या चौकीवर अतिरेक्यांनी अंधादुंध गोळीबार केला.पाकिस्तानी सेनेनं जारी केलेल्या माहितीनुसार ही घटना 25 आणि 26 जानेवारीच्या रात्री ही घडली आहे. यामध्ये एक अतिरेकी ठार झाला असून अनेकजण जखमी झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानसह चीनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.कारण हा दहशतवादी हल्ला बलुचिस्तानच्या भागात सुरू असलेल्या चायना- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉर (CPEC) प्रकल्पाच्या विरोधात असल्याचे BLA ने म्हटलेलं आहे. BLA ची ताकद वाढल्याचं सैन्यदलावरील या भीषण हल्ल्यानंतर स्पष्टं झालेल आहे.कारण मागील आठवड्यांत सुद्धां झालेल्या अशाच एका हल्ल्यात पाकिस्तानचे 10 जवान ठार झाले होते,आणि हे जवान CPEC प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात होते. त्यामुळे पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून जागोजागी अलर्टही जारी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे‌.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.