क्राईम/कोर्टपुणे
Trending

सहाय्यक पोलीस आयुक्तांचा पत्नी व पुतण्यावर गोळीबार, स्वतः ही केली आत्महत्या !

पोलीस दलात मोठी खळबळ

पुणे दि-24 अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामुळे राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांची पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भरत गायकवाड यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते.
     अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले भरत गायकवाड यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला होते. भरत गायकवाड यांनी पहाटे गोळीबार केल्याने परिसरात आवाज आला. त्यात पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यात जागीच ठार झाले. त्यानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःलाही संपवले. पोलीस दलात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या भरत गायकवाड यांनी अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे? त्यांनी पत्नी, पुतण्याला संपवून आत्महत्या का केली ? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले असून, पोलिसांनी त्या अनुषंगाने आता तपास सुरू केला आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button