राजकीय

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक – जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवार 15 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी नियोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक व मालेगाव अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे, माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर तालुक्यातील तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येवून प्रत्येक बसमध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणे करून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत घेवून जाणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळी व पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या दोनवेळच्या जेवणाच्या व्यवस्था, कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी याबाबत देखील नियोजन देखील करण्यात यावे.

या बैठकीनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी डोंगरे वसतीगृह मैदान या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुधंती शर्मा, कार्यकारी अभियंता

उदय पालवे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भिमराज दराडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button