क्राईम

पाडळसे येथे रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

यावल तालुक्यातील पाडळसे येथे बिथरलेल्या रेड्याच्या हल्ल्यात ४८ वर्षीय शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि-14/09/2020 दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडलेली आहे. रवींद्र भास्कर कोळी असे मयताचे नाव असून सुदैवाने दुसरा शेतकरी या हल्ल्यातून बचावलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील पाडळसे येथील महाकालेश्वर नगरमधील रहिवासी रवींद्र कोळी हे म्हशी व रेडा घेऊन सोमवारी नेहमीप्रमाणे चराईसाठी गेले होते दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक त्यांचा रेडा बिथरला रेड्याने रवींद्र कोळी यांच्यावर हल्ला केला ,त्यामुळे शेजारच्या शेतातील शेतकरी नरोत्तम श्रीधर कोळी यांनी रवींद्र बोलू यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने नरोत्तम कोळी यांच्यावरही हल्ला केला प्रसंगावधान राखून ते झाडावर चढल्याने बचावले तर रवींद्र कोळी यांचा या घटनेत मृत्यू झाला माहिती मिळताच उपसरपंच रजनीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खेमचंद्र कोळी, पोलीस पाटील सुरेश खैरनार यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेत रेड्यास पकडले. फैजपूर पोलीस ठाण्याचे हवालदार गोकुळ तायडे ,महेश वंजारी यांनी मृतदेह यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयात आणला असता डॉ. पी. बी. बारेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या घटनेची फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.