मनोरंजनमुंबई

पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांचे निधन, ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ हे त्यांच गाणं आजही प्रचंड लोकप्रिय

मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग, ज्यांनी बॉलीवूडचे अनेक गाणी आपल्या पहाडी आवाजात गायली, त्यांचे आज सोमवारी सायंकाळी निधन झाले, अशी माहिती त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी दिली आहे.


भूपिंदरसिंग यांना काही दिवसांपासून लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता,” अशी त्यांची शोकाकूल पत्नी मिताली यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेली आहे.भूपिंदर सिंग यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी पंजाबमधील अमृतसर या शहरात झाला होता. आज रोजी ते ८२ वर्षांचे होते. हे एक उत्तम भारतीय संगीतकार होते,मात्र त्यासोबतच ते मुख्यतः गझल गायक आणि बॉलीवूड पार्श्वगायक देखील होते. ते भारतीय-बांगलादेशी गायिका मिताली सिंगचे पती होते.

भूपिंदर सिंह यांनी १९८५ साली आलेल्या एतबार चित्रपटातील ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ ,आणी ‘मौसम’ चित्रपटातील ‘दिल ढुंढता है’ ही दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. तसेच ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियां’, ‘हकीकत’ आणि इतर अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी त्यांना लक्षात ठेवले जाईल.

Follow us Mediamail Social👇
Tags
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.