Crime

पाल घाटात कारला लागली आग,तरूण बचावले

सावदा ( प्रतिनिधी )-जळगावहून रावेर तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाल येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या चारचाकी वाहनाला दि-६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बोरघाटात अचानक आग लागली. परंतु सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी टळली.या प्रकरणी सावदा पोलिसात कोणतीही नोंद झालेली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथून काही तरूण मित्र चारचाकी वाहनाने सावदामार्गे पाल येथे जात होते, रविवारी दुपारी वाहन चालूस्थितीत जात असतांना गाडीत अचानक शॉर्ट -सर्किट झाल्याने चारचाकीला आग लागली. मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे गाडीतील पर्यटक व त्याचे सोबत असलेले सामान साहित्य त्वरित गाडीतून खाली उतरविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.घटनेत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली,परंतु या घटनेप्रकरणी प्रकरणी रात्री पर्यंत पोलिसात कोणतीही नोंद नाही.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.