मुंबईराजकीय

‘पिक्चर अभी बाकी है’ ? मध्यरात्री धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट,चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री 12.35 वाजता देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याचे समजते आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने “पिक्चर अभी बाकी है ? अशी चर्चा आता सुरु झालेली आहे.

Adv by sponsered

मुंडे-फडणवीस भेटीबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांचे स्पष्टीकरण

हे पण वाचामहाराष्ट्राचा “शॅडो मुख्यमंत्री” कोण होणार

रात्री धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे भाजप युवा मोर्चामध्ये एकत्रपणे काम होते. त्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत.म्हणूनच मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असावेत.धनंजय मुंडे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहे. विधानसभेत प्रमुख तोफ म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघतो. धनंजय मुंडे मुळातूनच भाजपकडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे संबंध असणे आणि त्यांनी भेट घेणे स्वाभाविक आहे,त्यांत शंकेचा प्रश्न नाहीच, असे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.