Crime

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटातून 35 लाखांचे सोने जप्त

पुणे दि:११ पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. सोन्याच्या दिवसेंदिवस वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. यातच सोन्याचे तस्करी करण्यासाठी तस्करा वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग अवलंब करीत असतात. अशाच प्रकारची घटना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलेले आहेत. दुबईहून पुण्यात आलेल्या प्रवाशांना तब्बल 34 लाख 80 हजाराच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी आपल्या पायातील बुटां मधून केल्याचा प्रकार पुणे सीमा शुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणांनी आज उघडकीस आणला आहे. या कारवाईत संबंधित प्रवाशांकडून 705 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आलेली आहे. या प्रवाशाची संबंधित अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता तो दुबई ते अहमदाबाद आणि त्याच विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे आला होता. प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला.या तस्कराने चिकटपट्टीने सोन्याची बिस्किटे गुंडाळून ती बुटात ठेवून आणल्याचे सीमा शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आलेली असून सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील पुणे विमानतळावर सोने तस्करीच्या घटना उघडकीस आलेल्या असल्याने पुणे हे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे केंद्र होत असल्याचे दिसून येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.