पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

पुणे दि-13 रेल्वे स्थानकाच्या आवारात जिलेटिन च्या कांड्या आढळून आल्यानंतर पुणे शहर पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकांनी (बीडीडीएस) आज कारवाई करत प्लेटफार्म क्रमांक 1 व 2,3 पूर्णपणे रिकामे केलेली आहे.तसेच रेल्वे स्थानकाच्या जवळची व समोरची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येऊन बॅरिकेट्स लावण्यात आलेली आहे.
पुणे शहर पोलीस आणि रेल्वे लोहमार्ग पोलीस (जीआरपी)चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तसेच पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सदरील जिलेटिनच्या कांड्या या नष्ट करण्यात आलेल्या असून प्रवाशांनी घाबरून जाऊ नये.तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेलं आहे.
जीआरपीचे पोलिस अधीक्षक सदानंद वास्ये पाटील म्हणाले की ,पुणे रेल्वे स्थानक परिसरात एक संशयास्पद वस्तू आढळून आली. पुणे आणि रेल्वेचे BDDS पथके घटनास्थळी आहेत आणि आवश्यक तपास करत आहेत.