Crime
Trending

पुण्यात 11 पिस्टल 14 काडतुस जप्त,3 लाख 35 हजारांचा मुद्देमालासह चौघांना अटक

पुणे दि-25 पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 46124 च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोठी कारवाई करुन पिस्टलची विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या तब्बल 11 गावठी पिस्टल जप्त केलेल्या आहेत. तसेच सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल खरेदी करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनला अग्नीशस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सोमवार दिनांक 18 रोजी रात्री पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पथकाला एक व्यक्ती वाघोली येथील केसनंद रोडवर पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळालेली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे ( रा. शनि शिंगणापूर ता. नेवासा जि. अहमदनगर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 3 पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे सापडली. त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्याला 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने तीन जणांना पिस्टल आणि जिवंत काडतुसे विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी निखील उर्फ सनी बाळासाहेब पवार रा.लोणी काळभोर याच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे, युवराज बापू गुंड (वय-24 रा. पांडव नगर, वडकी गाव, ता. हवेली) याच्याकडून 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस आणि अमोल नवनाथ तांबे (वय-27 रा. गोटूंबे आखाडा, ता. राहूरी, जि. अहमदनगर) याच्याकडून 2 पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करुन त्यांना अटक केली. तसेच आरोपी ज्ञानेश्वर डुकरे याच्या घरातून 3 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त केली.पुणे गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने या कारवाईत एकूण 3 लाख 35 हजार 600 रुपये किमतीचे 11 पिस्टल व 14 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मध्य प्रदेशातील आरोपी शंकर नायर (रा. उज्जैन) याच्याकडून हे पिस्टल रावेर तालुक्यालगत मध्यप्रदेशच्या सीमेजवळून व्हाया अहमदनगरमार्गे पुणे आणून त्याची पुणे परिसरात विक्री केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. पुणे पोलिसांचे विशेष पथक मध्यप्रदेशच्या रावेर तालुक्यालगतच्या परीसरात तपासाकामी रवाना झालेले आहे.काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी गावठी पिस्तुलांची एक मोठी खेप पकडली होती तेव्हा ते मध्यप्रदेशातूनच सीमेवरील चोपडा मार्गे पुणे तस्करी झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.