Crimeकोर्ट निकालपोलिस प्रशासनराष्ट्रीय
Trending

पुरावा म्हणून न्यायालयात आणलेल्या बॉम्बचा स्फोट,पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी दाखल

पुरावा म्हणून न्यायालयात आणलेल्या बॉम्बचा स्फोट झालेला असून या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


न्यायालयात बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे खळबळ


याबाबत ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,बिहार मधील पाटणा येथील कदमकुआन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मदन सिंह एका प्रकरणात पुराव्यासाठी स्फोटके घेऊन न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या आवारातील टेबलावर स्फोटके ठेवून ते कागदपत्रांचे काम करत होते. त्याचवेळी अचानक स्फोट झाला. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत पोलीस उपनिरीक्षकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. स्फोटानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दिवाणी न्यायालयात पोहोचले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आलेला आहे.

Adv by sponsored


पाटणा शहरातील मुलांच्या पटेल वसतिगृहातून नुकताच हा बॉम्ब जप्त करण्यात आला होता. हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आला होता. न्यायालयात सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक स्फोटके न्यायालयात आले. सोबत आणलेला बॉम्ब टेबलावर ठेवून इतर काहीतरी काम करत होते. यावेळी टेबलावर ठेवलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या घटनेत पोलीस अधिकारीही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

महाराष्ट्राचा ‘शॅडो मुख्यमंत्री’ आता कोण होणार ? राष्ट्रवादीचा होणार की शिवसेनेचा ?


दरम्यान ,या घटनेबाबत पाटणाचे एसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी माध्यमांना सांगितले की, कदमकुवा पोलीस ठाण्याचे ASI मदन सिंह यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, या घटनेत अन्य कोणीही जखमी झालं नाही. पाटणा शहरातील येथील पिरबहोर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर हे दिवाणी न्यायालय आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.