नाशिकपोलिस प्रशासन

पोलिसांनी पोलिस ठाण्यात वाढदिवस साजरा करू नये- डॉ बी.जी.शेखर पोलिस महानिरिक्षक नाशिक परीक्षेत्र यांचे आदेश

पोलिसांनी पोलिस ठाण्यात वाढदिवस साजरा करू नये- डॉ बी.जी.शेखर पोलिस महानिरिक्षक नाशिक परीक्षेत्र यांचे आदेश

नाशिक : वाढदिवस ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलिस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता आपापल्या घरीच साजरा करावा, असे आदेश नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिलेले आहे. नाशिक परीक्षेत्रातील नाशिक,अहमदनगर, धुळे ,नंदुरबार आणी जळगाव या पाचही जिल्ह्यांच्या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना हा आदेश देण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे आदेश
पोलिस महानिरिक्षक डॉ.बी.जी. शेखर यांनी निर्गमीत केलेले आहे.
अनेक ठिकाणी काही पोलिस अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाण्यांमध्ये अथवा कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरुपांमध्ये साजरे करीत आहेत. हे वाढदिवस साजरे करताना बर्‍याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्ती, दारु, सट्टा-मटका व इतर अवैध व्यवसाय चालविणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झाल्याचे दिसून आलेलं आहेत. त्याच प्रमाणे वाढदिवस साजरा करताना पोलिस ठाण्यामध्ये किंवा कार्यालयात मोठ्या आवाजामध्ये लाऊड स्पीकर लावून त्यावर नाचगाणे केले जात आहे. या प्रकाराचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा डागाळली जावून समाजामध्ये एक वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल व वाईट मत तयार होत आहे.
आपला वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून अधिकारी व अंमलदार यांनी वैयक्तिक स्तरावर पोलिस ठाणे सोडून आपले वाढदिवस साजरे करणे आवश्यक आहे. यापुढे पोलिस ठाणे आवारात किंवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येवू नयेत. पोलिस अधीक्षक यांनी याबाबत अखत्यारीतील सर्व अधिकारी व अंमलदार यांना लेखी स्वरुपात सूचना देवून यापुढे आपल्या जिल्ह्यातील पोलिस ठाणे अथवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिक स्वरुपात साजरे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल दहा दिवसांत सादर करावा, असेही डॉ. बी. जी शेखर पाटील यांनी आदेशात म्हटलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.