Crime

पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून पोलिसाची आत्महत्या,पुन्हा खळबळ

अमरावती दि:12 जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडालेली आहे. पोलीस आयुक्तालयातील विजय अडगोकर या पोलिस अधिकार्‍यानं काल आत्महत्या केली होती. त्यांच्या परिवाराने पोलीस आयुक्त व वळगावचे ठाणेदार आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लेखी तक्रार दिली होती. या घटनेला चोवीस तासही उलटलेले नाहीत.तोच आता आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आत्महत्याचं कारण समोर आलेलं नाही.
बाळकृष्ण राठोड (वय 50) हे पोलीस कर्मचारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यात कार्यरत होते. राठोड यांनी पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आज सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पोलीस मुख्यालयाची इमारत नव्यानेच बांधण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीवरून पोलीस कर्मचाऱ्याने उडी घेऊन आत्महत्या केली.पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करता त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी घटनेचा पुढील तपास दर्यापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी करत आहेत. अमरावती शहरात बुधवारी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. आणि आज ग्रामीणमधील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे. घटनेचा तपास दर्यापूर पोलीस करत आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.