मंत्रीमंडळ निर्णय

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

मुंबई, दि. 2 : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणार आहे.

या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117 बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे उपलब्ध आहे.

अर्ज स्वीकारण्यासाठी निकष अर्ज विहित नमुन्यात असावा तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या न जोडलेला प्रतीचे अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी तसेच तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर अशा स्वरुपाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.