Crime

प्रेमिकेकडून माजी प्रियकराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, नाशिक जिल्ह्यात खळबळ

नाशिक : जिल्ह्यात एका थरारक घटनेमुळे खळबळ उडालेली असून यात प्रेम प्रकरणातून मुलगी आणि तिच्या घरच्यांनी मिळून तिचा माजी प्रियकर असलेल्या एका युवकाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील देवळा तालुक्यातील लोहणेर येथे घडलेली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पीडित युवक 55%भाजला असून त्याच्यावर देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे. देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आई वडिल आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतलेले असून यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. पीडित मुलाचे आणि आरोपी मुलीचे मागील सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने दोघांचे ब्रेक अप झाले त्यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र ते लग्न मोडले,याच रागातून या पीडित तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे काही तरी कारणावरून ब्रेक अप झालेलं होतं. ब्रेकअप का झाले ते कळू शकलेलं नाही. त्यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरलेलं होतं. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन मुलीने त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.