आरोग्य

प्लाझ्मा थेरपीचा कोरोना रूग्णांवर उपयोग शून्य- ICMR,AIIMS

नवीदिल्ली ( वृत्तसंस्था PIB) -देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यात अनेक रुग्णांना कुठे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर. बेड्स, तर कुठे प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. यात अनेक रुग्णालयांमध्ये प्लाझ्माचा गैरवापर आणि अवैज्ञानिक वापर होत असल्याचे निदर्शनास आलेलं आहे. यापार्श्वभूमीवर देशाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांना देशातील काही आघाडीचे वैज्ञानिक, डॉक्टर, आणि व्हायरस एक्सपर्टसनी पत्र लिहिले आहे. या पत्रात सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी लिहिले की, कोवॅलेसेंट प्लाझ्माचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत आहे. कोरोनाविरोधात जी प्लाझ्मा थेरेपी वापरली जात आहे. ती ICMR च्या गाईडलाइन्सविरोधात आहे. त्याचबरोबर शास्त्रज्ञांचे असेही म्हटले आहे की, कोरोनाचा नव्या व्हेरियंटविरोधात रोगप्रतिकारक्षमता (अँटीबॉडीज) कमी संवेदनशील आणि निष्क्रिय ठरत आहे.

केंद्रीय आरोग्य तज्ज्ञांना लिहिले पत्र 

वॅक्सिनोलॉजिस्ट गगनदीप कांग आणि सर्जन प्रमेथ सीएस या जेष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, कोव्हॅलेसेंट प्लाझ्माचा होणार अवैज्ञानिक वापर आणि दुरुपयोगामुळे देशात कोरोनाचे आणखी नवे स्ट्रेन निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्लाझ्मा थेरपीने महामारी आणखी वाढेल. त्यामुळे आम्ही सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीने हे सांगू इच्छितो की, भारतात प्लाझ्मा थेरपीचा योग्य उपयोग होत नाही.
या पत्राद्वारे आयसीएमआर प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना संबोधित करताना असे म्हटले आहे की, देशात सुरु असणाऱ्या प्लाझ्मा थेरपीदरम्यान सरकारी यंत्रणांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनांना पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हस्तक्षेप करत करण्याची विनंती करतो जेणेकरुन कोरोना रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, कोरोना रुग्णालयातील आरोग्य तज्ञांचे शोषण रोखता जाईल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात क्लिनिकल गाइडलाईन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ एडल्ट कोविड-19 पेशेंट्स’ जाहीर करत सांगितले की कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्माचा ऑफ लेबल उपयोग केला जाऊ शकतो, यावर देशातील आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. कारण कोरोनाबाधित मध्यम लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे दिसण्याच्या 7 दिवसांचा आत प्लाझ्मा थेरपी वापरली जाऊ शकते.

प्लाझ्मा मिळविण्यासाठी रूग्णांच्या कुटुंबियांची धावपळ

केंद्राचा मार्गदर्शक सुचनांमध्ये असेही लिहिले आहे की, कोरोनाबाधितावर प्लाझ्मा थेरपीचा वापर सात दिवसानंतर काहीच उपयोगाचा नाही. तर देशभरातील आरोग्या तज्ज्ञांच्या संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की, कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा कोणताही उपयोग होत नाही. असे असूनही, देशभरातील रूग्णालयात याचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. रुग्णाला प्लाझ्मा मिळविण्यासाठी रूग्णांचे कुटुंबिय धावपळ करत आहेत. प्लाझ्माची कमतरता असताना रुग्णांचे कुटुंबिय रुग्णालयांचा पायऱ्या झिजवत आहेत. पण रुग्णाला प्लाझ्माची गरज नसतानाही डॉक्टर प्लाझ्मा थेरपी का लिहून देत आहेत?

प्लाझ्मा थेरपीचा कोरोना रुग्णांवर उपयोग शून्य

कोरोनाच्य़ा गंभीर संसर्गातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा रक्तातील प्लाझ्मा उपचार घेतलेल्या रुग्णाला देत उपचार केले जात आहेत. परंतु या उपचाराची गरज अगदीच सुरुवातीला होती. सध्याच्या संशोधनात असे स्पष्ट होतेय की, रुग्णाला प्लाझ्मा थेरपीची आवश्यकता लागत नसून ही आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधातही आहे. कारण सध्याच्या संशोधनात प्लाझ्मा थेरपी रुग्णांवर उपयोगी ठरत नसल्याचे दिसत आहे.या पत्रात तज्ज्ञांनी ICMR-PLACID चाचणीचा उल्लेख केला आहे. या चाचण्या देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात घेण्यात आल्या असे लिहिले आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे समोर आले आहे की कोरोना संक्रमण कमी करण्यात कोव्हलेंट प्लाझ्माची यापुढे कोणताही उपयोग होत नाही किंवा ही थेरपी कोणाचेही जीवन वाचवू शकत नाही. तज्ज्ञांनी म्हटले आहे की,11,588 रूग्णांवर झालेल्या चाचण्यांमध्येही हे स्पष्टपणे समोर आले आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किंवा हॉस्पिटल डिस्चार्ज झालेल्या रूग्णांच्या प्रमाणात काहीही फरक पडलेला नाही.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.