कृषि

“फलोत्पादन क्षेत्र विकास” योजनेत केळीसाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा- पंकज पाटील, केळीतज्ज्ञ

जळगाव – फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘फलोत्पादन क्षेत्र विकास’ म्हणजेच “हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम” ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.

‘फलोत्पादन क्षेत्र विकास’ योजनेत केळीसाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा- पंकज पाटील ,केळीतज्ज्ञ शेतकरी

देशातील विविध फळांसाठी १२ राज्यातील ५३ जिल्ह्यांमधील पथदर्शी कार्यक्रमाचा विचार करून फलोत्पादन क्षेत्र विकास योजनेचा प्रारंभ केला. जळगाव जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यात सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातून संपूर्ण देशाला केळीचा पुरवठा करण्यात येतो. तरी सुद्धा केळीचा देशासह परदेशात सर्वात मोठा पुरवठा करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? याचा साधा विचारही या योजनेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी अत्यंत निराश आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, आणि चोपडा या भागात केळी हे पारंपरिक व मुख्य पीक असून, येथे देशातील उत्कृष्ट प्रतीची केळी उत्पादित केली जाते. जळगाव हा देशासह परदेशात केळीचा सर्वात मोठा पुरवठा करणारा जिल्हा आहे. इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, बहारिन, अझरबैजान आणि कुवैत अशा देशांमध्ये केळीची निर्यात करण्यात येत असून, अशा अनेक देशांकडून दिवसेंदिवस केळीची मागणी वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन ‘फलोत्पादन क्षेत्र विकास’ योजनेत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश केला जावा अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात केळी हे मुख्य पीक असून याठिकाणी उत्तम दर्जाचे केळी उत्पादन केले जाते, तसेच जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही मुख्यतः केळीवर अवलंबून आहे,अशातच आता केंद्रशासनाने जळगाव जिल्ह्याला केळी क्लस्टर मधून वगळल्याने मालाची किंमत व निर्यात संबंधी केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे फायदे बंद होणार आहे. आधीच नैसर्गिक संकटांनी उद्धस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर हा अन्याय असून जळगाव जिल्ह्याचा केळी क्लस्टरमध्ये पुन्हा समावेश करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.