महाराष्ट्रमुंबईरंजक माहितीसंपादकीय

मालदीव व मॉरिशसला विसरा, कोकण किनारपट्टी देतेय टक्कर, देवेंद्र फडणवीसांनी केले मनमोहक फोटो ट्विट

मुंबई दि- ११, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्यद्वीप ला दिलेल्या भेटीनंतर मालदीवच्या नवजात मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतावर द्वेषभावनेतून केलेल्या अभद्र टिपण्या आणि त्या देशाचे राष्ट्रपती मोईज्जू ज्या पद्धतीने चीनच्या कुशीत जाऊन बसलेत ते बघून त्यावरून स्वाभिमानी भारतीयांनी मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मीडियावर तुफान मोहिम चालविली आहे. सध्या जगभरातील मीडियाने या गाजत असलेल्या मालदीव-भारत वादविवादावर मालदीवला चांगलेच खडेबोल सुनावले असून गेल्या काही दशकांपासून सातत्याने भारताने मालदीव साठी केलेल्या वैद्यकीय, आर्थिक व लष्करी मदतीची आठवण दक्षिण आशियातील प्रसार माध्यमांसह पश्चिमी माध्यमांनी देखील मालदीवला करून दिली आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रचारात ‘इंडिया आऊट’ चा नारा देणाऱ्या मालदीवच्या विद्यमान सत्ताधारी लोकांना चांगलीच मिरची झोंबलेली आहे. विशेष म्हणजे मोदींनी लक्ष्यद्वीपच्या पर्यटन वाढीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संबोधित करताना कोणत्याही देशाचा नामोल्लेख केला नव्हता.
त्यातच आता मोदींच्या लक्ष्यद्वीप भेटीनंतर भारतीय पर्यटन प्रेमींनी आपल्या देशातील सुंदर आणि मालदीव व माँरिशस यांसारख्या प्रसिद्ध समुद्री पर्यटनस्थळांना तोडीसतोड असणाऱ्या भारतातील पर्यटन स्थळांची माहिती व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भारतीय काही समुद्र किनारे एवढे सुंदर,नितळ व मनमोहक आहेत की ते बघितल्यावर ते भारतातीलच आहे.यावर विश्वास बसत नाही. अशा देशी पर्यटनस्थळांच्या पर्यटन वाढीसाठी गरज आहे ती फक्त उत्तम ‘ब्रँडिंगची’ तसेच त्या ठिकाणी पर्यटनाभिमुख पायाभूत सोयीसुविधा उभ्या करणे सरकारची जबाबदारी आहे.

फोटो – मालवण किनारा
मालवणचे मालदीवला तगडे आव्हान
परवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या x अकाउंट वर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या सुंदर व मनमोहक समुद्रकिनाऱ्यांची फोटो व्टिट केली होती. आपल्या कोकणालाही अफाट निसर्गसंपदा व सौंदर्य लाभलेल असून महाराष्ट्रातील पर्यटकप्रेमींनी कोकणला भेट देऊन इथल्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे असे म्हटलेलं आहे.तसेच पुढे लिहिलंय की, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला ते भारतातील पहिले एकात्मिक स्कुबा डायव्हिंग स्कूल , महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्सचे स्थापत्य पाहून मंत्रमुग्ध व्हा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

sources by x @dev-fadanvis


तारकर्ली समुद्र किनारी अरबी समुद्राचे विशालकाय निळ्याशार अरबी समुद्राचे विहंगम दृश्य नक्की बघा असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. यामुळे केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातील समुद्री पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून येते आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button