क्राईम

फुलगावजवळ भीषण अपघातात तिघे दुचाकीस्वार जागीच ठार

भुसावळ दि-25 तालुक्यातील तळवेल येथील तीन तरुण दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघे दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना फुलगाव जवळील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 च्या उड्डाणपुलावर सायंकाळी 6.20 वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तळवेल गावावर शोककळा पसरलेली आहे. दरम्यान हे तिघे जण दुचाकीने भुसावळकडून वरणगावकडे जात असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. या दुर्घटनेत घनश्याम राजेंद्र पाटील (वय 22), पांडुरंग सुनिल पाटील (वय 23),देवानंद सोपान पाटील (वय 25)
सर्व रा.तळवेल ता.भुसावळ यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. याबाबत वरणगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी अज्ञात वाहनाचा तपास करीत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.