Crime

बँक मॕनेजर, पंटरसह सीबीआयच्या जाळ्यात

पारोळा तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून त्याच्या पीक कर्जाच्या मंजुरीसाठी 75 हजार रुपयांची लाच घेणे बँक ऑफ बडोदा पारोळा शाखेच्या शाखाव्यवस्थापकाला व त्याच्या पंटरला चांगलेच महागात पडलेले असून या दोघा आरोपींना पुण्याच्या सीबीआयच्या पथकाने अटक केलेली आहे.यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली असून बँकांमध्ये शेतकऱ्यांकडून पीक कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून होणारी लूट या घटनेने जनतेसमोर आणलेली आहे. बँक ऑफ बडोदा पारोळा शाखेचे शाखाव्यवस्थापक किरण ठाकरे व खाजगी पंटर नरेंद्र गणेश पाटील अशा दोघांना या लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पारोळा तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याच्या 7 लाख 10 हजार पीक कर्ज प्रकरणाच्या मंजुरीसाठी शाखास्थापक किरण ठाकरे यांनी एकूण रकमेच्या आठ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती. हे पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर तक्रार शेतकरी रोखीने लाच देण्यासाठी बँकेत गेले असता शाखाव्यवस्थापकाने लाच रोख स्वरूपात न स्वीकारता त्या शेतकऱ्याकडून बेरर चेक लिहून घेतला आणि आज गुरूवारी तो वटवलाही ,त्यातील पन्नास हजार रुपये शाखा व्यवस्थापकाने आणि ठेवून बाकी पंचवीस हजार रुपये खाजगी पंटरला देण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी या लाच प्रकरणी पडताळणी करून सापळा रचण्यात आलेला होता. या दोघा आरोपींविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.त्यानंतर शाखा व्यवस्थापक किरण ठाकरे यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात तब्बल दहा लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आलेली आहे. ही सर्व रक्कम जप्त करण्यात आलेली असून पुढील चौकशीत आणखीही काही बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.