Crimeमुंबई

बंद पडलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत चौघांचे मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ

मुंबई : (Mumbai crime) मुंबईतील पश्चिम भागातील कांदिवली परिसरात जोरदार वर्षावृष्टि होत असतानाच दुसऱ्या बाजूला एका बंद पडलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने या परीसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे रुग्णालय गेल्या 15 वर्षांपासून बंद होते आणि याच रुग्णालयाच्या इमारतीत हे मृतदेह आढळून आलेले आहेत. मृतकांमध्ये दोन मुली, त्या मुलींची आई आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.

बंद रूग्णालयात 4 जणांचे मृतदेह सापडले

Adv by sponsered

कोण होते हे कुटुंब?
या मृतकांमध्ये किरण दळवी (46), त्यांच्या मुली मुस्कान (26), भूमी (17) आणि त्यांचा गाडीचा चालक शिवदयाल सेन (60) यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील इंदोर येथील दळवी परिवाराचं हे रुग्णालय होतं. मात्र, गेल्या 15 वर्षांपासून ते बंद अवस्थेत आहे. या कुटुंबाचं रहिवास याच रुग्णालयाच्या इमारतीतच होता. किरण यांचे पती काही वर्षांपूर्वी इंदूर येथे निघून गेले होते. किरण यांची सासू राधाबाई यांच्या नावाने उभारण्यात आलेलं हे रुग्णालय 15 वर्षांपूर्वी बंद झालं होतं.
मुंबईतील झोन 11 चे डीसीपी विशाल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा चालक असलेला शिवदयाल सेन हा गेल्या 10 वर्षांपासून त्या परिवारासोबत राहत होता. शिवदयाल यानेच किरण आणि मुस्कान यांची हत्या केली आणि त्यानंतर सेन आणि भूमी या दोघांनी मिळून आत्महत्या केली. भूमी हिनेच शिवदयाल सेन याच्यासोबत मिळून आपली आई आणि बहिणीची हत्या केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा : पुरावा म्हणून न्यायालयात आणलेल्या बॉम्बचा स्फोट,पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी दाखल


घटनास्थळी सुसाईड नोट
कांदिवली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला की एक व्यक्ती या रुग्णालयात फिरत आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा रुग्णालयाचा दरवाजा बंद होता त्यामुळे लॉक तोडला. किरण यांचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर होता आणि मुस्कानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये मुस्कानचा मृतदेह आढळून आला. तर भूमी आणि शिवदयाल सेन यांचे मृतदेह पहिल्या मजल्यावरील एका बंद खोलीत आढळून आले. आम्हाला घटनास्थळावर चार सुसाईड नोट आढळून आलेल्या असून यामध्ये कौटुंबिक कलहामुळे हे पाऊल उचलल्यांचं म्हटलं असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.