क्राईम

बनावट दारूसाठी लागणारे 2लाख 46 हजाराचे स्पिरीट जप्त

मयुरेश निंभोरे, मो.9325250723

वृत्तसंस्था -शिरपूर तालुक्याची ओळख काही काळ स्पिरीटचा तालुका म्हणून रूढ झाली होती मात्र मागील काही काळापासून पोलिसांच्या सतर्कतेने धडक कारवाई करून बनावट दारू तस्करांचे धाबे दणाणले असून बनावट दारु प्रकरणांवर अंकुश लावण्यात शिरपूर शहर आणि
तालुका पोलीस स्टेशन ला मोठ्या प्रमाणावर येत आहे.
असेच बनावट दारुसाठी उपयोगात येणारे स्पिरिट महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आणण्यात आल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी दिनांक 7 ऑगस्ट रोजी एक पथक तयार करून शिरपूर तालुका येथील खैरखुटी वन शिवाराच्या परिसरात वनक्षेत्रात तपासणी सुरू केली असता खैरखुटी वनक्षेत्र नाल्याच्या काठी एक इसम पोलिसांना पाहून पळून जात असताना दिसून आला त्यास पोलीस शिपाई श्याम पावरा यांनी पाठलाग करून पकड़ले असता त्याला विचारपूस केली असता त्याचे नाव शामु भगत असे होते त्याने दिलेल्या माहितीवरून एका काडी व मातीचा झोपडीमध्ये स्पिरिट ने भरलेले 6 मोठी प्लास्टिकचे बॅरल आढळून आले. सदरच्या मुद्देमाल जप्त करून याठिकाणी 2 लाख 46 हजार रुपये किंमतीचे लपवून ठेवलेले प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 1200 लिटर स्पिरिट आढळून आले. या स्पिरिट चा वापर बनावट दारू तयार करण्यासाठी केला जाणार होता. यात आरोपी शाम भगत राहणार पळासनेर
तालुका शिरपूर जिल्हा धुळे या अटक करून वरील मुद्देमाल करत पोलीस शिपाई योगेश दाभाडे यांच्या जप्त फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65/ ए व इ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.