बनावट धाड टाकल्या प्रकरणी CBI चे चार अधिकारी निलंबित !ब्लॅकमेलिंग भोवली ! सुटी काढून केलेली योजना फसली

चंदिगड दि-12 येथील एका कंपनीच्या व्यापाराच्या घरी सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांनी दिनांक 10 मे रोजी धाड टाकून संबंधित व्यापाऱ्याकडून लाखो रुपयांची मागणी केल्याची तक्रार संबंधित व्यापाऱ्याने सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने संचालक सुबोध जयस्वाल यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दोन दिवसांच्या चौकशीनंतर चार अधिकाऱ्यांच्या झालेल्या चौकशी व त्यांच्या घर व कार्यालयातील घेतलेल्या झाडाझडतीच्या चौकशी अहवालाच्या आधारे ही धाड बनावट असल्याचे सिद्ध झाले.तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्या चार उपनिरीक्षक दर्जाच्या सीबीआय अधिकाऱ्यांना संचालक सुबोध जैस्वाल यांनी आज निलंबित केलेले आहे. अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर सी जोशी यांनी माध्यमांना दिलेली आहे. या बनावट धाडीमुळे सीबीआयच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत असून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. विशेष म्हणजे हे चारही अधिकारी धाड टाकण्याच्या दिवशी रजेवर गेलेले असल्याची माहिती प्रवक्ते आर सी जोशी यांनी सांगीतलेली आहे.
भ्रष्टाचार कदापि खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे हे एक लाजिरवाणे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याला गांभिर्याने घेत त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.यातील सुमित गुप्ता, प्रदीप राणा ,अंकुर कुमार आणि आकाश अहलवात या दिल्लीस्थीत युनिटमधील अधिकाऱ्यांना बनावट धाडी प्रकरणी एजन्सीने ताब्यात घेतलेले होते. या अधिकाऱ्यांनी 10 मे रोजी संबधीत तक्रारदाराच्या कार्यालयात बनावट धाड टाकून त्यांना दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक केली जाईल. अटक टाळण्यासाठी 25 लाख रुपये द्यावे अशी जबरदस्तीची धमकी या अधिकाऱ्यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
देशभरातील धाडी खऱ्या की बनावट?
त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी सीबीआयच्या पडणाऱ्या धाडी या खऱ्या की खोट्या ? त्यातील अधिकारी ड्युटीवर असतात की सुट्टीवर ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. सीबीआयच्या “झिरो टॉलरन्स” पद्धतीनुसार कोणालाही सोडले जाणार नसल्याचे सुबोध जैस्वाल यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलेले आहे. आज चक्क सीबीआयच्याच चार अधिकाऱ्यांना बनावट धाडी प्रकरणी निलंबित केल्याने “झिरो टॉलरन्स” नीतीचा योग्य अवलंब होत असल्याचे आर सी जोशी यांनी सांगितलेलं आहे.