Crimeमुंबई

बनावट बंदुकीच्या सहाय्यानें सराफ दुकान लुटण्याचा महिलेचा प्रयत्न, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

चक्क बंदूकसदृश्य दिसणाऱ्या सिगारेट लायटरचा धाक दाखवून एका बारबालेने ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.मात्र,या बहाद्दर सराफाने प्रसंगावधान दाखवून या महिलेचा शिताफिने प्रतिकार करत तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे.


विरार पश्चिमधील ग्लोबल सिटी भागात देवनारायण नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या दुकानात खरेदीसाठी आली होती. त्यावेळी देवलाल गुजर हे दुकानात एकटे होते.तब्बल दोन तास ती महिला लग्नासाठी दागिने बघत असल्याचा बहाणा करत होती. दुपारी अचाकन एकच्या सुमारास तिने पिशवीत लपवून आणलेली बंदूक काढली आणि दुकानमालकाला धमकावत दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी केली.
यावेळी ज्वेलरी शॉप मालक देवलाल गुजर यांनी प्रसंगावधान दाखवत मोठ्या शिताफिने तिला पकडत तिचा लुटीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर शेजारील दुकानदारांनी पोलिसांना फोन करून बोलवून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.
अर्नाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला बारबाला असून मिरारोड येथील एका बारमध्ये काम करते.या महिलेच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिने आणलेली नकली बंदूक सिगारेट लायटर होती. तिची पार्श्वभूमी आम्ही तपासत असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी माध्यमांना दिली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.