वृत्तविशेष

बापरे ! बँकेच्या खात्यात 15 लाख आले, पंतप्रधान मोदींचे आभारही मानले,औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

औरंगाबाद दि:8 – सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेत विदेशातील काळापैसा भारतात आणणार तसेच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, हे पैसे नागरिकांना मिळालेच नसल्याने या मुद्द्यावरुन विरोधकांकडून भाजपवर अनेकदा टीकाही करण्यात येते.मात्र औरंगाबादमधील शेतकऱ्याच्या खात्यात खरोखर 15 लाख रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्यचकीत झालाना ? होय पण हे खरय !! औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख रुपये खरोखर जमा झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर खरच 15 लाख रुपये जमा झाले.प्रचंड आनंदात असलेल्या या शेतकऱ्याने जमा झालेल्या 15 लाखांपैकी 9 लाख रक्कम काढून स्वतःसाठी घर सुद्धा बांधून घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आभारपत्रही पाठवले

दरम्यान या शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याने आभाराचा मेल सुद्धा पाठवला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाने याची संबधीत बँकेत चौकशी केली असता काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ समोर आला. संबंधीत बँक प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या शेतकऱ्यासमोर हात जोडून विनंती करत आहे की, पैसे चुकून जनधन खात्यावर जमा झालेत ते बँकेत परत करावे म्हणून !

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या जनधन खात्यावर पाच महिन्यांपूर्वी 15 लाख जमा झाले होते. ज्ञानेश्वर यांनी काही महिने वाट पाहिली तरी खात्यातून पैसे वळते झाले नाही किंवा कुणी तशी विचारणा सुद्धा केली नाही, म्हणून त्यांनी खात्यातून पैसे काढून जवळपास 9 लाखाच्या वर पैसे काढून घर बांधलेले आहे.

बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांना नंतर लक्षात आले ग्रामपंचायत पिंपळवाडी ग्राम पंचायतीच्या खात्यात हे पैसे जमा करायचे होते तेच पैसे चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर ज्ञानेश्वर औटे यांच्या खात्यात उरलेली रक्कम बँकेने फ्रीज करून परत वळती करून घेतली. आता बँक ज्ञानेश्वर यांच्याकडे पैसे बँकेला परत करण्याची विनंती करीत आहे. मात्र ते आता हे पैसे गृहकर्ज म्हणून दिले असे म्हणून मासिक हप्त्याने भरण्याची तयारी दर्शविलेली आहे.

“खात्यात 15 लाख येणार” च्या आठवणींना उजाळा.

सदरील रक्कम हा शेतकरी जरी परत करणार असला तरी मात्र, 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेत विदेशातील काळापैसा भारतात आणणार तसेच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचं म्हटलं होतं,त्या आठवणी मात्र पुन्हा जाग्या झाल्या असून लोकांमध्ये या घटनेची बरीच चर्चा सुरू आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.