आरोग्य

बाबा रामदेव यांची अॕलोपॕथीक सायन्सवर टिका,या वक्तव्याचा IMA कडून निषेध

नवी दिल्ली : अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) योगगुरू बाबा रामदेव यांचा निषेध केलेला आहे. राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो असे आयएमए द्वारकाच्या वतीने निवेदन जारी कलेले आहे.

देशातील कोरोना लढ्यात आतापर्यंत 1200 हून अधिक डॉक्टरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. त्या सर्व डाॕक्टरांचा बाबा रामदेव यांनी अवमान केलेला आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. देश कोरोनाच्या भयंकर संकटाला तोंड देत असताना बाबा रामदेव यांनी वापरलेल्या अवमानजनक आणि असंस्कृत भाषेमुळे अनेक समस्त डॉक्टर वर्गाच्या कामामध्ये नकारात्मकता येऊ शकते असेही नमूद करण्यात आलेले आहे.

आपल्या जीवाचा व कुटुंबाचा विचार न करता देशातील डॉक्टर कोरोनाच्या या काळात झोकून देऊन रुग्णांची अविरत सेवा करत आहेत आणि हे स्वयंघोषित बिझनेस बाबा त्यांच्याबद्दल खोटी आणि निराधार माहिती देऊन तिरस्कार समाजात पसरवत आहे. तसेच बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावे डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधावर देखील परिणाम होऊ शकतो असेही या निवेदनात म्हटलेले आहे.

बाबा रामदेव काय म्हणाले ?
बाबा रामदेव यांचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा रामदेव अॅलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसून येत आहेत. त्यात बाबा रामदेव म्हणाले की, अॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्यांनी अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही भाष्य केले आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींमध्ये बाबा रामदेव बद्दल चिड निर्माण झालेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.