क्राईम

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न,आरोपीला अटक

मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीनांदू येथील आठ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पिंप्रीनांदू ता. मुक्ताईनगर येथील आरोपी संजय उर्फ पिंट्या भागवत कोळी वय (30) याने दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास येथील आठ वर्षीय लहान मुलीला खेळण्याच्या गोट्या देण्याचे आमिष दाखवत द्रोपदाबाई पुंडलिक इंगळे यांच्या घरात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी भेदरलेल्या लहान मुलीने आरडाओरड केल्याने आसपासच्या ग्रामस्थांना घडलेली घटना लक्षात येताच संशयीत आरोपी संजय भागवत कोळी यास पकडून चांगलाच चोप देण्यात आला व त्यानंतर त्याला मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे.
या संशयीत आरोपी विरुद्ध लहान बालकांच्या लैंगिक अत्याचार (पोस्को) व ॲट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे करत आहेत.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.