बिबट्यांनी बैलाचा फडशा पाडला,यावल वनविभाग सतर्क

यावल -तालुक्यातील डोंगर कठोरा येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे या आदिवासी पाड्यावर दोन बिबट्यांनी आदिवासी बांधवांच्या बैला वर दिनांक 8 रोजी रात्री हल्ला चढवला. त्यात बैल ठार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन बिबट्यांनी हल्ला केला असल्याची माहिती आदिवासी बांधवांनी दिली .
ही घटना शुक्रवारी रात्री घडली या प्रकरणी वन विभागाला रविवारी माहिती देण्यात आली. डोंगर कठोरा गावालगत डोंगरदे हा आदिवासी पाडा आहे. या वस्तीत आदिवासी बांधव राहतात घराजवळ जनावरे बाधलेली असतात .येथील डोंगर सिंग भीलाला यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री हे आपल्या झोपडीत झोपले असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघाची डरकाळी ऐकायला आली त्यांनी झोपडीतून बाहेर बघितले असतात दोन बिबट्यानी त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या बैलावर हल्ला करून त्या ओढत नेले या दोन बिबट्यांनी बैलास थेट त्यांच्या घरासमोरील भुईमुगाच्या शेतात नेले. आणि तिथे तीन तास धुमाकुळ घालत ते तेथेच होते. दोन्ही बिबटे यावेळी मोठ्या आवाजात डरकाळी फोडत होते. दोघेही परस्परांना लढतही होते. डोंगरसिंग भीलाला यांनी आपल्याकडील बॅटरीचा प्रकाश झोपडीतून बिबट्यांच्या दिशेने नेत जोरात आवाज दिला असता काही वेळाने दोन्ही बिबटे तेथून निघून गेले.त्यांनी बैलाची शिकार करून फस्त ही केला .याबाबत वनविभागास रविवारी उशिरा माहिती देण्यात आल्याचे भिलाला यांनी सांगितले.

याबाबत डोंगर कठोरा वनपाल रविंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की हा हल्ला बिबट्यांनी केलेला आहे.या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित आदिवासी बांधव नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.