Crime
बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ,शिकारीचा संशय?
जळगाव – जळगाव तालुक्यातील ममुराबादपासून जवळ असलेल्या नांद्रा फाट्यावर आज पहाटेच्या 6 वाजेच्या सुमारास एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक ,अपघात कि शिकार? याचा तपास सुरू असून घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे.