क्राईम

बेपत्ता इसमाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

मयुरेश निंभोरे , मो.9325250723

जामनेर -सासरवाडी असलेल्या गंगापुरी ता जामनेर येथुन तीन दिवसांपासुन गायब असलेल्या ३२ वर्षीय ईसमाचे शव एका विहीरीत आज (८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास सापडले.जिवन बाबुराव साळूंके (भिल) मुळ राहणार पळासखेडा बुद्रुक ता जामनेर असे आहे.
याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पंधरा दिवसांपासुन मयत पळासखेड्याहुन गंगापुरी येथील सासरवाडीत गेला होता,त्याची पत्नी आणी दोन्ही मुलेही सासरवाडीतच होती.मात्र बुधवारपासुन तो गायब होता.आणी आज शनिवार रोजी गंगापुरी शिवारातील विश्वनाथ चौधरी यांच्या शेतातील विहीरीत एका ईसमाचे प्रेत तरंगत असतांना दिसुन आले.प्रेताची ओळख पटल्यानंतर जिवन साळूंकेचेच असल्याने परीसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याघटनेबाबत मयताच्या नातेवाईकांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त करून कारवाईची मागणी केली.यामुळे आता मयत जिवनची आत्महत्या की खुन हा प्रश्न अद्यापतरी अनुत्तरीत आहे.तुर्त पोलीस ठाण्यामधे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close