राजकीय

बेरोजगारांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करू-पालकमंत्री

मयुरेश निंभोरे , भुसावळ

मो-9325250723

दि-14/09/2020 केंद्र व राज्यशासन बेरोजगार तरूण-तरूणी,महिला बचत गट, लघुउद्योजक,आणि स्टार्टअपच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करणारे नवउद्योजक यांच्यासाठी मुद्राकर्ज, विविध महामंडळे,तसेच जिल्हाउद्योग केंद्राच्या विविध शासकीय कर्ज योजनाद्वांरे बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदर आणि सवलतींच्या व्याजदरात कर्जपुरवठा केला जातो. बेरोजगारांना व्यवसाय उभारण्यासाठी आणि बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी शासकीय आदेशानुसार यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार,तसेच सर्व सरकारी बँकांचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगारांसाठी मेळावे आयोजीत करण्यात आलेले होते.आणि या मेळाव्यामध्ये बेरोजगारांना शासकीय योजनांच्या धोरणानुसार व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरकारी बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती.या मेळाव्यात मिळालेल्या आश्वासनानुसार जिल्ह्यातील काही बेरोजगारांनी बँकांकडे कागदपत्रांची पुर्तता करून कर्जमागणी केलेली होती.परंतु असे निदर्शनास आले की नंतरच्या काळात लाॕकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाल्याने अनेकांचे चालू व्यवसाय सुद्धा बुडाल्याचे चित्र दिसून आले आणि तेव्हाच्या पेक्षा आता बेरोजगारीचे प्रमाण कित्येक पटीने अधिक वाढलेले दिसून आलेले आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आता कर्जाची अत्यंत आवश्यकता असून बँकांनी कर्ज देण्यासाठी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे. याबाबतचा लक्षवेधी मुद्दा “मिडिया मेल न्यूज“ने पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्याशी संपर्क करून कळविले असता त्यांनी तात्काळ याची दखल घेत जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत व संबंधित यंत्रणांना याबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून व नियमात-धोरणात बसत असताना सुद्धा बेरोजगार व नवलघुउद्योजकांना कर्ज नाकारणाऱ्या तसेच कर्ज प्रकरणे मुद्दाम पेंडिंग ठेवणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी दिलेली आहेत.यामुळे आता जिल्ह्यातील बेरोजगारांना कर्ज मिळण्याची अपेक्षा असून अनेकांना व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.