Crimeशैक्षणिक विशेष

बोगस TET उत्तीर्ण झालेल्यांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता,अनेकांचा जीव टांगणीला

पुणे दि:११, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता (TET Exam) परीक्षेसंदर्भातील घोटाळ्यासंदर्भात आणखी माहिती समोर आली आहे. टीईटी घोळ्यातील आरोपी तुकाराम सुपेनं जी. ए सॉफ्टवेअरच्या संचालकांकडून पैसे घेतल्याची कबुली पुणे पोलीसांना तपासात दिलेली आहे. तुकाराम सुपेला परीक्षेचं कंत्राट दिलेल्या जी ए सॉफ्टवेअरचा संचालक शिवकुमार याने तब्बल 30 लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे. संचालक शिवकुमारने ही माहिती पोलीस तपासात दिली आहे. याशिवाय तुकाराम सुपेनं 2018 या वर्षीचे प्रकरण दाबल्याची पोलीस चौकशीत माहिती दिली आहे. जळगावच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 81 बनावट प्रमाणपत्र देऊनही सुपेनं काही कारवाई केली नाही नसल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा पोलीस कोठडीत तपास चालणार आहे.
टीईटी परीक्षेचं आयोजन करणाऱ्या जीए सॉफ्टवेअर कंपनीकडून तुकाराम सुपेनं पैसे घेतल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. जी ए सॉफ्टवेअरचा संचालक शिवकुमार यानं तुकाराम सुपे याला 30 लाख रुपये दिले असल्याची माहिती पुणे पोलिसांच्यावतीनं करण्यात आलेल्या तपासात म्हटलं आहे.
2019 च्या टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या 7 हजार 880 जणांपैकी तब्बल 1003 अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात,पुण्यात 323 अपात्र तर जळगावात 81अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचे समोर आलेलं आहे.
जी.ए. टेक्नॉलाजीचा अभियंता गणेशन हा ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलिसांसमोर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या टीईटी घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचं समोर येत आहे. राज्यात 7800 जणांनी बोगस पद्धतीने पैसे देऊन TET परीक्षा पास झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे. आता या घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू झालेला असून याची व्याप्ती राज्यभर वाढणार असल्याचे संकेत दिसून येत आहे. त्यामुळे बोगस पद्धतीने तथा पैसे देऊन TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी हल्ली शासकीय वेतन घेणाऱ्या संबंधित शिक्षकांवर त्यांची सेवा समाप्ती करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.