आरोग्य

बोदवड स्टेट बँकेत 8 लाख 40 हजाराची चोरी

बोदवड : बोदवड शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाच्या ताब्यातून तब्बल 8 लाख 40 हजारांची रोकड घेवून भामटा अलगद पसार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 11.30 ते 11.50 दरम्यान घडली.यामुळे बोदवड शहरात खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड शहरातील अमर डेअरीच्या मालकीची ही रक्कम असून संबंधित एका इसमाने बँकेत भरणा करण्यासाठी ही रक्कम आणलेली होती.बँकेतील कॅश काऊंटरवर संबंधित इसम कॕश भरण्यासाठी आला असता त्यांनी रोख रक्कम असलेली पिशवी एका खुर्चीवर ठेवल्यानंतर दुसऱ्या पिशवीतून ते भरणा करण्यासाठीची रक्कम देत असतानाच पाळत ठेवून असलेल्या एका भामट्याने अलगद खुर्चीवरून पिशवी लांबविलेली आहे. या पिशवीत आठ लाख 40 हजारांची रोकड होती. दरम्यान, सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून चोरट्याने निळ्या रंगाचा शर्ट व तपकिरी पँट घातल्याचे स्पष्ट झालेले आहे.या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलेले असून पुढील तपास बोदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे हे करीत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.