भरधाव कंटेनरने दुचाकीवरील दाम्प्त्याला उडविले,महिला जागीच ठार

रावेर- तालुक्यातील केऱ्हाळा-भोकरी फाट्यावर आज दुपारी ट्रकने मोटारसायकल ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर बऱ्हाणपूर महामार्गावर भोकरी फाट्यावर रविवारी दुपारी १.३५ वाजता घडली. मंगलाबाई सोपान शिरसाठ वय ३८ रा.वखारी ता. जि.बऱ्हाणपूर ही महिला जागीच ठार झाली असून तिचा पती या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. वखारी येथील रहिवासी असलेले सोपान कडू शिरसाठ हे पत्नी मंगलाबाईसह केऱ्हाळा खुर्द येथील मंगलाबाईच्या आजीची तब्येत खराब असल्याने भेट घेण्यासाठी शनिवारी आलेले होते. ते दुपारी १.३० ते वखारी येथे मोटारसायकल क्रमांक-एम पी.१२एच.डी. ९१५८ ने जात असताना रावेरकडून बऱ्हाणपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक-एमपी ०७ एचबी ३३७१ ने जोरदार धडक दिल्याने मंगलाबाई या जागीच ठार झालेल्या आहे. तर त्यांचा पती सोपान शिरसाठ हे या अपघातात गंभीर जखमी झालेले आहेत .त्यांना पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे पाठविण्यात आलेले आहे. याबाबत येथील रावेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. ट्रकचालक रामप्रसाद जगडीशसिंग यादव रा.गोरमी ता. मेहेगव जि. भिंड (मध्यप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून ट्रक जप्त करण्यात आलेला आहे.