क्राईम

भरधाव डंपरने दोन दुचाकींना उडविले,एक जण ठार

फैजपूर -भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची घटना यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळील दुसखेडा फाट्याजवळ मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात भुसावळ शहरातील वाल्मीक नगरातील बत्तीस खोली भागातील रहिवासी अजय धिक्याव (वय ३८) या युवकाचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खडी भरलेला डंपर क्रमांक एमएच १९ एम एच ९८९१ने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात विना क्रमांकाच्या दुचाकीवरील अजय ढिक्याव यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील दोन जण जखमी झाले, त्यांची नावे समजू शकली नाहीत. गंभीर जखमी असलेल्या अजयला डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तथा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडल्या. हा अपघात फैजपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असून घटनास्थळी सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे,महेश वंजारी, ज्ञानेश्वर पवार,उमेश सानप यांनी धाव घेऊन पाहणी केली. डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.