जळगावनिवडणूकमुंबईराजकीय

भाजपच्या सर्व आमदारांची जबाबदारी आ.गिरीश महाजन यांचेवर,देवेंद्र फडणवीस आणी गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत खलबतं

भाजपच्या सर्व आमदारांची जबाबदारी आ.गिरीश महाजन यांचेवर,देवेंद्र फडणवीस आणी गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत खलबतं

मुंबई:- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाचे 40 बंडखोर आमदार हे हिंदुत्ववाच्या मुद्दयावरून भाजपसह सत्ता स्थापनेसाठी आग्रही असल्यामुळे राज्यात सत्तांतराचे वारे वाहू लागलेले आहे. यामुळे महाराष्ट्र भाजपचे नेतेही सतर्क झालेले असून त्यांनी सत्तास्थापनेसाठी विशेष रणनीती आखलेली आहे.यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागलेली आहेत. भाजपने त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व आमदारांना मुंबईला येण्याचे आदेश दिलेले असून या सर्व आमदारांची जबाबदारी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्याकडे सोपविलेली आहे. तसेच सर्व आमदारांनी “रिचेबल” राहण्याचे आदेश दिलेले असून प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचेही सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाचे 40 आमदार हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देणार असल्याने आज किंवा उद्या मध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करू शकतात.
त्यामुळे भाजपच्या गटात प्रचंड हालचाली सुरू झालेल्या असून दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा व भाजपचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी सत्तास्थापने संदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.