राजकीय

भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने- देवेंद्र फडणवीस विपक्ष नेते

मुंबई दि:11 पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहेत.तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचे संस्कार हे दीनदयाळजींच्या विचारांमुळेच झालेले असून भाजपा त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी गोवा येथून व्हर्चुअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी घेतला होता. कोरोना महामारीच्या संकटात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनसेवेला महत्त्व दिले तसे महत्त्व अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले नाही. भाजपा दीनदयाळजींच्या विचारांवरच वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या सर्वांसाठी घरकुल योजना, उज्ज्वला योजना, उजाला योजना अशा गरीब जनतेच्या कल्याणाच्या योजनांमध्येही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा दिसत असून आत्मनिर्भर भारत हे दीनदयाळजींच्या चिंतनाचे पुढचे पाऊल आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानवतावाद आणि त्यांच्या विचारांसाठी संपूर्ण भारत त्यांचा ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.