खान्देशजळगावराजकीय

भाजपामधील काही आमदारांनी मला विजयासाठी मदत केली- एकनाथराव खडसे

भाजपामधील काही आमदारांनी मला विजयासाठी मदत केली- एकनाथराव खडसे

भाजप मधील माझ्या काही आमदार मित्रांनी माझ्या विधान परिषदेतील निवडणुकीच्या विजयासाठी मला मदत केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विजयी उमेदवार एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. खडसे पुढे म्हणाले की राष्ट्रवादीच्या मतांचा कोटा हा 51 पर्यंतच होता मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांना एकूण 58 मते पडली तसेच मला 29 मते पडली म्हणजेच मला अपेक्षेपेक्षा आणि कोट्यापेक्षा तीन ते चार मध्ये जास्त पडले यामुळेच मी परिषदेच्या निवडणुकीत विजय होऊ शकलो अशी प्रतिक्रिया आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिलेली आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार एकनाथराव खडसे यांना निवडणुकीच्या विजयासाठी मतदान करणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आता खुद्द खडसे यांनीच भाजपातील जुन्या आमदार मित्रांनी मदत केल्याचा दावा केल्याने पुन्हा एकदा भाजपातील खडसे समर्थक आमदार चर्चेत आलेले आहे.

तसेच यापूर्वी मी विधानसभेत व मंत्रिमंडळात काम केले असून त्या अनुभवाच्या जोरावर आता विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात जनहिताची आणख चांगली कमी करून दाखवणार असल्याची ग्वाही एकनाथराव खडसे यांनी दिलेली आहे. आता खडसेंच्या या धक्कादायक विधानाने खडसेंच्या विजयासाठी मतदान करणारे भाजपमधील ते आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. यामुळे खडसेंच्या या विधानाचा अर्थ त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील भाजपातील खडसे समर्थक आमदारांकडे जात आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.