राजकीय

भाजप आमदाराच्या गाडीचे चक्क 3 टायर फुटले, सुदैवाने सर्वजण सुखरूप

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते हे आज विविध कामांसाठी मतदारसंघात ते गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचे चक्क तीन टायर फुटले. सुदैवाने त्यांना या अपघातात कोणतीही इजा झालेली नाही. आपण सुखरुप असल्याचं त्यांनी व्हिडिओ जारी करुन सांगितलेलं आहे.
राम सातपुते हे 2019 च्या विधानसभा निवडणूकीत निवडून आलेले भाजपचे युवा डॅशिंग आमदार आहेत. आपल्या पक्षाची रोखठोक आणि आक्रमक पद्धतीने बाजू मांडण्यासाठी त्यांची राज्यभरात ओळख आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात.
अपघातानंतर राम सातपुते “मतदारसंघातील प्रवासादरम्यान झालेल्या अपघातामध्ये गाडीचे तीन टायर फुटले. परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, आजपर्यंत माझ्या हातून जे काही पुण्य घडलं तसेच पांडुरंगाच्या कृपेने मी या अपघातातून सुखरूप बचावलो. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही. मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही”.
राम सातपुते यांच्या अपघाताचं वृत्त समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखं पसरलं. तेव्हापासून तालुक्यातील तसेच राज्यसभरातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे त्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.