राजकीय

भाजप नेते आ. गिरीषभाऊ महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

आज भाजपचे नेते माजी मंत्री आ. गिरीषभाऊ महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्र शासनाने केलेल्या नवीन कृषी कायद्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच या कृषी कायद्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले. तसेच ह्या कायद्यातील तरतुदी शेतकरी बांधवांसाठी कश्या लाभदायक आहेत ह्याबदद्ल माहिती दिली.काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी अखेरचे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.आता आ.गिरीषभाऊ महाजन हे अण्णांचे मन वळविण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरेल.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.