राज्य-देश

भाजप नेते आ.टि राजा सिंह यांचे फेसबुक अकाऊंट अखेर बंद

हैदराबाद-(वृत्त संस्था)-भाजपा नेते आणि काही फेसबुक अकाऊंटवर कारवाई करण्यास फेसबुक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याच्या बातमीनं भारताच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली होती. जुलै महिन्यात अमेरिकेतील प्रसिद्ध द वॉल स्ट्रीट जर्नलनं याविषयीचा वृत्तांत प्रसिद्ध केल्यानंतर फेसबुक व भाजपाची मिलीभगत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. मार्क झुकेरबर्गला यासंदर्भात विचारणाही करण्यात आली होती. त्यानंतर आता फेसबुककडून भाजपाच्या आमदारावर कारवाई करण्यात आली आहे.
भाजपा नेत्याच्या द्वेषयुक्त भाषणावरून ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचं ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर फेसबुकने ज्या भाजपा आमदाराच्या पोस्टवरून वादाला तोंड फुटलं, त्यांच्यावर कारवाई केली आहे. तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. राजा सिंह यांच फेसबुक अकाउंटही बंद करण्यात आलं आहे.
“द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टमुळे फेसबुकच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यावर बंदी घालण्यात आली,” अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली. बुधवारी कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीसमोर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. विरोधकांच्या वाढत्या राजकीय दबावानंतर राजा सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
टी राजा सिंह यांनी गेल्या महिन्यात ट्विटरवरील व्हिडिओमध्ये दावा केला होता की त्यांचे कोणतेही अधिकृत फेसबुक पेज नाही. “अनेक लोकं माझ्या नावाने फेसबुक पेज चालवत आहेत हे मला कळले आहे. माझ्याकडे कोणतेही अधिकृत पेज नाही, त्यामुळे कोणत्याही पोस्टसाठी मी जबाबदार नाही.” असे राजा सिंह यांनी सांगितले. राजा सिंह यांनी त्यांच्याकडे फक्त एक अधिकृत यूट्यूब अकाउंट आणि एक अधिकृत ट्विटर अकाउंट असल्याचा दावा केला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.