आरोग्य
भाजप नेते एकनाथरावजी खडसेंच्या घरी गणरायाची स्थापना

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात आज भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांचे घरी गणरायाचे आगमन झालेले आहे. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. कोरोनापासून बचाव करणारी लस लवकर मिळू दे, सर्वांवर आलेले अनिश्चिततेचे मळभ लवकर दूर होऊ देत. अशी प्रार्थना बाप्पाचरणी माजी मंत्री श्री.एकनाथरावजी खडसे (मा . विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य ) यांनी केलेली आहे. याप्रसंगी सौ . मंदाताई खडसे (अध्यक्ष ..जळगाव जिल्हा दुध विकास फेडरेशन ) , श्रीमती रक्षाताई खडसे (खासदार रावेर लोकसभा मतदार संघ ) कु क्रिसिका खडसे , चि . गुरुनाथ खडसे असे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.