वृत्तविशेष

भारतरत्न लता मंगेशकर कालवश, सुमधुर स्वर मात्र अजरामर

मुंबई- भारताची गानकोकिळा ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8.12 च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दुःखद निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.यामुळे देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या सात दशकांपासून आपल्या सुमधूर आवाजाने देशासह जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि पन्नास हजारांपेक्षा अधिक गाणी गायनाचा विश्वविक्रम नावे असलेल्या लता मंगेशकर नावाच्या युगाचा आज अंत झालेला आहे. लता मंगेशकर यांना ओळखत नाही असा एकही भारतीय सापडणार नाही लहानांपासून तर वृध्दांपर्यंत सर्वांनाच लतादीदींच्या आवाजाने भुरळ घातलेली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत 1940 सालापासून आजतागायत मेहनतीने संगीत विश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या लता मंगेशकर कायमच भारतीयांच्या मनात घर करून राहतील यात शंकाच नाही. त्या आज निघून गेलेल्या असल्या तरीही त्यांचा आवाज कायमच अमर राहणार आहे. त्यांच्या सुरेल,सुमधुर स्वरांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांना नवी ओळख मिळाली काही सुपरहिट तर काही ब्लॉक बस्टर झाली यामुळे बॉलीवुडवर खूप मोठी शोककळा पसरली आहे.
लतादीदींच्या बाबतीत जितके लिखाण करावे तितके कमीच आहे. लतादीदींनी भारतीय अभिजात संगीतात अजरामर कामगिरी केलेली असून उच्च प्रतीचे पार्श्वगायन त्यांनी विविध भाषांमध्ये केलेले आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह अनेक दिग्गज राजकीय नेते व अभिनेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत.
प्यार किया तो डरना क्या, नाम गुम जायेगा,ए मेरे वतन के लोगो, मेरे नैना सावन भादो, ये कहा आ गये हम, लग जा गले के फिर ये, शिशा हो या दील हो ,सोला बरस की बाली उमर ने, मै हु खुश रंग हीना, ये गलीया ये चौबारा, तूने ओ रंगीले कैसा जादू किया यासह असंख्य अजरामर सुपरहिट गीत लतादीदींनी गायलेली आहेत. त्यांना “मीडियामेल” न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.