आंतरराष्ट्रीयवृत्तविशेष

भारताचा बिजींग हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन व समारोप समारंभावर बहिष्कार,चीनची कुरापत आली समोर

नवी दिल्ली : कुरापतखोर चीनने पुन्हां एकदा आपला खरा रंग दाखविलेला आहे. चीनमध्ये होणाऱ्या हिवाळी बिजींग ऑलिम्पिक २०२२ च्या उद्घाटन आणि समारोप समारंभांवर भारताने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कोणताही भारतीय राजनयिक उद्घाटन आणि समारोप समारंभाला उपस्थित राहणार नाही.भारत सरकारच्या या निर्णयानंतर प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी हिवाळी ऑलिम्पिकचा उद्घाटन आणि समारोप समारंभ भारतात प्रसारित होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
चीनने भारताला हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत सहभागी असलेल्या लष्करी कमांडरची चीनने ऑलिम्पिक मशाल वाहक म्हणून निवड केली होती. चीनच्या या कारवाईनंतर भारताने हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.