भुसावळकरांना तापीनदीवर श्रीगणेश विसर्जनास बंदी


भुसावळ शहरातील कोव्हीड १९ चा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्या वर्षी गणशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे शासनाचे निर्देश आहेत.शासनाचे निर्देशानुसार आणि कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव असल्या कारणाने
गर्दी होवु नये म्हणुन यावर्षी सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेशाचे विसर्जन करता येणार नाही.तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आलेले आहे की,सर्व सार्वजनिक, खाजगी व घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन जागेवर आपले घरीच करण्यात यावे.शक्य नसल्यास स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने खालील नमुद ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. १)पी.के.कोटेचा
कॉलेज,शांतीनगर, २)द.शि.विद्यालय, यावल रोड, ३)प्रभाकर हॉल, गजानन महाराज नगर रोड ४)लोणारी मंगल कार्यालय, जळगांव रोड, ५)भुसावळ हायस्कुल ,जळगांव रोड, ६)खाचणे हॉल स्वामी समर्थ केंद्राजवळ, ७) विठ्ठल मंदिर , व्हि.एम.वार्ड, ८)ए.जी.सी.स्कुल, वरणगांव रोड,
९)डि.एल.हींदी हायस्कूल, शिवाजी नगर, १०)गणपती मंदिर, गडकरी नगर, ११)माळी भवन, तुकाराम नगर (हायवे जवळ) १२)म्युनिसीपल हायस्कुल, जामनेर रोड १३)काशिविश्वेश्वर मंदीर,चमेली नगर वांजोळा रोड १४)तु.स.झोपे गुरुजी शाळा, हनुमान नगर, १५)आनंद हॉल, साई पेट्रोलपंपासमोर जामनेर रोड, १६)संतोषी माता हॉल, रिंग रोड, १७)नाहाटा कॉलेज, जामनेर रोड, १८)वासंती महाजन न.पा.शाळा, खडका रोड भुसावळ ,१९) फिल्टर हाऊस, कवाडे नगर अशा ठिकाणांची निवड केलेली असुन आपण आपले सार्वजनिक व घरगुती गणपती मुर्ती आपल्या
जवळच्याच मुर्तिसंकलन केंद्राजवळ विसर्जनाकरीता गणेश मुर्ती जमा करण्यात यावी.सदर सर्व मुर्तिसंकलन केंद्रावर पुजारी नेमण्यात आले असुन विधीवत पुजा करुन सदर मुर्तीसंकलन केंद्रावरुन सर्व मुर्ती संकलीत झालेवर नगरपालिके मार्फत गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.तरी सर्व नागरीकांनी व मंडळाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी की यावर्षी तापीनदीवर गणेश विसर्जन पॉईन्ट ठेवण्यात आलेले नाही.तरी तापी नदीवरील विसर्जनास प्रशासनामार्फत त्या दिवशी बंद करण्यात आलेले आहे. तरी कृपया आपण आपले सार्वजनिक, खाजगी, व घरगुती गणपती तापी नदीवर अगर इतर कोणत्याही ठिकाणी विसर्जनासाठी नेवु नये.असे भुसावळ शहरातील नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.