भुसावळचे डाॕ कोळंबे यांना खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी
भुसावळ- भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्निल कोळंबे व इतर स्टाफ यांना दीनदयाल नगर मधील चार इसमांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन चाकूचा धाक दाखवून खंडणी मागून जिवेठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दिनांक 22/10/2020 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी डॉ.स्वनिल राजाराम कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 12/10/2020 रोजी रात्री 7.55 वाजेपासून ते 21/10/2020 रोजीचे रात्री 8.00 वाजेच्या दरम्यान जामनेर रोडवरील कोळंबे हॉस्पिटल येथे इसम नाव कलिम शेख राहणार दीनदयाल नगर , भुसावळ संदीप पूर्ण नाव माहीत नाही व त्यांचे इतर दोन अनोळखी साथीदारांनी फिर्यादीच्या हॉस्पिटल मध्ये येऊन फिर्यादी व इतर स्टाफला चाकूचा धाक दाखवून मला 50 हजार प्रति महिना खंडणी द्यावी अशी मागणी केली ,आणि फिर्यादीस शिवीगाळ करून खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या हॉस्पिटल मधील फोनवर फोन करून “तुमको हॉस्पिटल चलाना है की नही कलीम शेख बात कर रहा हू तुमको मुझे हर महिना 50 हजार रुपये देने पडेंगे नही तो तुमको जानसे मार डालूंगा” अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या आदेशानुसार दिनांक 22/10/2020 रोजी 3.59 वाजेला बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन 901/2020 भा.द.वि.कलम 387,504, 506,507,34, 3,25,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोटला करीत आहेत.