क्राईम

भुसावळचे दोन सख्खे बंधू अपघातात ठार ,सिंधी कॉलनीत शोककळा

भुसावळ -जळगाव येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा व्यवसाय करणारे दोघे भाऊ काम आटोपून दुचाकीने घरी भुसावळला येत होते . काल गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील ट्रॅक्टरच्या शो – रूमसमोर भरधाव डंपरला धडक दिल्याने दोन्ही तरूण भावांचा मृत्यू झाला. हे दोघे बंधू भुसावळातील सिंधी कॉलनीतील रहिवासी होते . मनीष सुरेशकुमार दरडा आणि रितेश सुरेशकुमार दरडा अशी दोघांची नावे आहेत .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील जुन्या प्रायमरी स्कूल जवळील रहिवासी मनीष दरडा (वय ३०) आणि रितेश दरडा (वय २६) हे दोघे भाऊ महामार्गावरून दुचाकीने जळगावकडून भुसावळला येत होते . साकेगाव ओलांडल्यावर ट्रॅक्टर शो- रूमच्या समोर दुचाकी व डंपरचा ( क्रमांक जीजे.१२- वाय .८१०६ ) अपघात झाला . त्यात मनीष आणि रितेश या दोन्ही भावांचा मृत्यू झाला.यापैकी मनीषचा घटनास्थळी , तर रितेशचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला . ही माहिती भुसावळात कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान , रितेशचा विवाह झाला असून त्यास दोन महिन्यांचा मुलगा आहे , असे सिंधी कॉलनीमधील सूत्रांनी सांगितले.तसेच अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे देखील घटनास्थळी दाखल झाले.मृत दोन्ही भावांचे मृतदेह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.या दुदैवी घटनेमुळे सिंधी कॉलनीत प्रचंड शोककळा पसरलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.