क्राईम
भुसावळच्या तापीनदीपात्रात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

भुसावळ- भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील तापी नदीपात्रात मित्रासह पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रथमेश मनोहर मोरे (वय 12), रा. रेल्वे नाॕर्थ काॕलनी, भुसावळ हा अल्पवयीन मुलगा कंडारी शिवारातील तापी नदीपात्रात मित्रासह पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.